Wednesday, February 25, 2026
शिवसेनेच्या रणरागिणी प्रियंका संदेश गुंजाळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल
शिवसेनेच्या रणरागिणी प्रियंका संदेश गुंजाळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल...

अलिबाग: अलिबाग पंचायत समिती निवडणुकीत वरसोली पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या (शिंदे गट) रणरागिणी प्रियंका संदेश गुंजाळ यांनी आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी (दि.२०) निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्याकडे सादर केला. आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून मतदारसंघात मोठी विकासकामे करण्यात आली आहेत. ही विकासकामे तसेच आपण व कुटुंबीयांचा मतदारसंघात असलेला संपर्काच्या जोरावर आपला विजय निश्चित होईल असा विश्वास प्रियंका गुंजाळ यांनी व्यक्त केला.

अलिबाग पंचायत समितीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान तर ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. २१ जानेवारीपर्यंत नामनिर्देशनपत्र भरण्याची मुदत असून, २२ जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार आहे. २७ जानेवारीपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत आहे.

पंचायत समितीच्या वरसोली मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गट) रणरागिणी प्रियंका संदेश गुंजाळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. वरसोली मतदारसंघावर शिवसेना (शिंदे गट) वरचष्मा असल्याचे दिसून येते. आकदर महेंद्र दळवी यांचे प्रियांका गुंजाळ व संदेश गुंजाळ हे कट्टर समर्थक असून, महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून गुंजाळ दांपत्याने मतदारसंघात विविध विकासकाने पूर्ण केली आहेतं. या जोरावर आपलं विजय निश्चित होईल असा विश्वास प्रियांका गुंजाळ यांनी व्यक्त केला आहे.

प्रियंका गुंजाळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या माजी गटनेत्या मानसी दळवी उपस्थित होत्या.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx