Saturday, December 27, 2025
१० दिवसांनतरही बिबट्याला पकडण्यात यंत्रणा अपयशी
१० दिवसांनतरही बिबट्याला पकडण्यात यंत्रणा अपयशी...

देश महाराष्ट्र

अलिबागअलिबाग तालुक्यातील नागाव, आक्षी परिसरात एका बिबट्याचा वावर आढळून आला आहे. १० दिवस उलटूनही बिबट्याला पकडण्यात वन विभागाला apash आले आहे. बिबट्याने आत्तापर्यंत ८ जणांवर हल्ला करीत त्यांना जखमी केले आहे. सध्या बिबट्या आक्षी साखर परिसरात असून, येथे बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने ५ पिंजरे लावले आहेत. पिंजऱ्यात बिबट्यासाठी कोंबड्या तसेच मटणाची मेजवानींतजेवुनेही बिबट्या पिंजऱ्यात येत नसल्याने वनविभागातील अधिकारी व कर्मचारी हतबल झाले आहेत. बिबट्या येथील खाडी किनारी असलेल्या घनदाट कांदळवन क्षेत्रात लपून बसला आहे. यामुळे त्याचा शोध घेण्यात वनविभागाला मर्याद येत आहेत. आक्षी साखर येथे बुधवारी (दि.१७) बिबट्याचे शेवटचे दर्शन झाले. यांनतर पुणे बिबट्या बचाव पथकाला गंगेत देत कांदळवन क्षेत्रात गेला आहे.

अलिबाग जवळच्या नागाव मधील वाळंज पाराेडा खालच्या आळीत भर वस्तीत ९ डिसेंबर सकाळी बिबट्याचा वावर आढळून आला. दिवसभरात बिबट्याने सहा जणांवर हल्ला केला. बिबट्याला पकडण्यासाठी अलिबाग वनविभागाचे कर्मचारी यांच्यासह राेहा येथील व पुणे वनविभागाच्या रेस्क्यू टिम दाखल झाल्या. मात्र बिबट्याला पकडण्यात यंत्रणेला अपयश आले. यांनतर दोन दिवस बिबट्या कुणाच्याही दृष्टीस पडला नाही. यामुळे रेस्क्यू टीम परत गेल्या. नंतर १२ डिसेंबर नागाव लगत असलेल्या आक्षी गावातील साखर परिसरात बिबट्या आल्याचे उघड झाले आहे. यावेळी बिबट्याने साखर परिसरात दोन जणांवर हल्ला करीत त्यांना जखमी केले. यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी अलिबाग वनविभाग व रोहा वनविभागाच्या रेस्क्यू टीमने आक्षी साखर येथे बिबट्याला पकडण्यासाठी सापळा रचित पाच पिंजरे लावले. या पिंजऱ्यांमध्ये कोंबड्या व मटण ठेवण्यात आले. मात्र बिबट्या पिंजऱ्यात न गेल्याने बिबट्याला पकडण्याच्या वनविभागाच्या प्रयत्नांवर पाणी फेडले गेले. १२ डिसेंबर नंतर १७ डिसेंबर रोजी पुन्हा बिबट्या साखर परिसरात दिसून आला होता.

बिबट्या आक्षी साखर येथे खाडी किनारी असलेल्या घनदाट कांदळवन क्षेत्रात गेला आहे. यामुळे त्याला शोधण्यात मर्यादा येत आहेत. येथे ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र यातही वनविभागाला अपयश आले आहे. यामुळं परिसरात गस्त तसंच पिंजऱ्याकडे लक्ष ठेवण्यापकीकडे वनविभागाला काहीही कार्य येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.


सदर बिबट्या हा मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यातून आला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र फणसाड ते नागाव हे सुमारे २५ किलोमीटर असून, एवढ्या दूर वनक्षेत्रातून बिबट्या समुद्र किनारी क्षेत्रात  कसा आला हा प्रश्न अनुत्तरित आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx