अलिबाग : अलिबाग तालुक्यातील नागाव गांवात बिबट्या दिसून आला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागाव परिसरामध्ये बिबट्याने काही जनावर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. बिबट्याच्या या दहशतीमुळे संपूर्ण गाव व परिसर भीतीच्या छायेखाली असल्याचे बोलले जात आहे. नागाव मधील तीन व्यक्तींवर बिबट्याने हल्ला केल्या असून, दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची चर्चा सुरू आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx