अलिबाग : अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून संदिप पालकर व श्वेता पालकर निवडणूक लढवित आहेत. शनिवारी (दि.२२) पक्षांच्या महिला आघाडी तालुका संघटिका स्नेहल देवळेकर यांच्या हस्ते गणेश मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
अलिबाग नगरपरिषद निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये शेकाप, काँग्रेस आघाडी व भाजप, शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांसमोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संदिप पालकर व श्वेता पालकर यांचे आव्हान असणार आहे.
संदिप पालकर व श्वेता पालकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. गणेश मंदिरात प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर मतदारांच्या घरोघरी जात संदिप पालकर व श्वेता पालकर यांनी आपला प्रचार सुरू केला. प्रचार फेरीत शिवसेना कार्यकर्ते व मतदार सहभागी झाले होते. पालकर यांच्या प्रचार फेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx