अलिबाग : राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या अलिबाग नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या पक्षांनी एकत्र येत महायुतीची घोषणा केली आहे. या युतीकडून नगराध्यक्ष पदासाठी सौभाग्यवती तनुजाताई पेरेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पेरेकर यांच्या नावाची घोषणा भाजपचे रायगड जिल्हा भाजप अध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांनी समारंभात केली.
तनुजा पेरेकर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर, सर्व भाजपचे नगर परिषद प्रचार प्रभारी सतीश धारप यांच्या हस्ते पेरेकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲड महेश मोहिते, शोभा जोशी, आणि इतर सहयोगी पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमताने या निर्णयाचे स्वागत केले.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx