Wednesday, February 25, 2026
अलिबाग नगरपरिषदेत भाजपचे ॲड.अंकित बंगेरांचा उमेदवारी अर्ज दाखल
अलिबाग नगरपरिषदेत भाजपचे ॲड.अंकित बंगेरांचा उमेदवारी अर्ज दाखल...

अलिबाग : अलिबाग नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टीचे सुप्रसिद्ध वकील ॲड.अंकित बंगेरा यांनी प्रभाग क्र. ७-ब मधून नगरसेवक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना भाजपचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी आमदार प्रशांत दादा ठाकूर,आमदार महेश बालदी, भाजप नेते आस्वाद पाटील, सरचिटणीस महेश मोहिते यांसह पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे उमेदवाराला मोठा पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट झाले असून, अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत यामुळे नव्या राजकीय समीकरणांना चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx