Saturday, December 27, 2025
अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशनच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न
अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशनच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न ...

देश महाराष्ट्र 

अलिबाग : कुरुळ‌ येथील आरसीएफ मैदानावर अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशनच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ट्रायथोलॉन पट्टू डॉ. महेंद्र पवार उपस्थित होते. त्यांनी त्यांचा डॉक्टर ते ॲथलेटिक्स  हा प्रेरणादायी प्रवास सर्व श्रोत्यांसमोर उलगडला. 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. वैभव भगत यांनी उपस्थितांनि शारीरिक कसरती आणि व्यायाम याबू प्रोत्साहित केले. या कार्यक्रमास संस्थेचे सर्व सदस्य व माजी अध्यक्ष डॉ. दोषी, डॉ. संदेश पाटील, डॉ. गणेश गवळी, डॉ. मयूर कल्याणी, डॉ. रवी म्हात्रे, डॉ. आशिष भगत, डॉ. अनघा भगत, डॉ. राजेंद्र मोकल, डॉ. मकरंद आठवले उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या नियोजनात कमिटीचे डॉ. ओंकार पाटील, डॉ. अमेय केळकर, डॉ. अमित बेनकर, डॉ. वैजेश पाटील, डॉ. सॊनली नाईक, डॉ. निशिकांत ठोंबरे, डॉ. भूषण शेळके, डॉ. पल्लवी शेळके, डॉ. आदेश मोकाल, डॉ. समीर धाटावकर, डॉ. अभिराज पाटील, डॉ. रश्मी गंभीर, डॉ. प्रांजली पाटील यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.‌ क्रिडा स्पर्धेमध्ये क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि कॅरम अशे मैदानी आणि इन डोअर स्पर्धा घेण्यात आल्या.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx