Saturday, December 27, 2025
अलिबाग वडखळ महामार्गाचे चौपदरीकरण करण्याची मागणी
अलिबाग वडखळ महामार्गाचे चौपदरीकरण करण्याची मागणी...

देश महाराष्ट्र

अलिबागअलिबाग वडखळ महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी केली जात आहे. सुट्टीच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या महामार्गाचे चौपदरीकरण होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. सध्या अलिबाग वडखळ जर ३० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना साधारणपणे दीड ते दोन तास लागत असल्याचे दिसून येते.

अलिबाग वडखळ या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या या महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. महामार्गाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर असला तरी अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी उद्घावत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. शनिवार रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी या मार्गावरील वाहनांची संख्या लक्षणीय संख्येनी वाढते. त्यामुळे वाहतुकीचा वेग वेग मंदावतो. ३० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी साधारणपणे दीड ते दोन तास लागतात. नादुरुस्त रस्ता या समस्येत एकच भर घालतो. त्यामुळे या महामार्गाचे चौपदरीकरण करावे अशी मागणी अलिबागकरांकडून केली जात आहे.

पूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. कार्लेखिंड परिसरात बोगदा करून महामार्गाचे चौपदरीकरण होणार होते. यासाठी साडे बाराशे कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. रस्त्याच्या कामासाठी २५० कोटी तर भूसंपादनासाठी ९०० कोटी खर्च अपेक्षित होता. प्रस्तावित अलिबाग विरार कॉरिडोर याच क्षेत्रातून जाणार असल्याने नंतर हा प्रस्ताव बारगळला. हा प्रस्ताव बारगळल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्ता राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे हस्तांतरित केला. गरीब हस्तांतरणाची प्रक्रिया प्रक्रिया लांबल्याने गेली पाच वर्ष या रस्त्याच्या देखभाल दुरुस्ती कडे दुर्लक्ष झाले त्यामुळे महामार्गाची दयनीय अवस्था झाली होती. आता रस्ता दुरुस्तीचे काम मंजूर झाले असले तरी प्रत्यक्ष कामाला गती मिळू शकलेली नाही.

अलिबाग विरार कॉरिडोर पहिल्या टप्प्यात बळवली पर्यंत होणार असल्याने, अलिबाग वडखळ महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी हाती घ्यावे अशी मागणी अलिबाग करांकडून केली जात आहे. सातत्याने होणारी वाहतूक कोंडी आणि नादुरुस्त रस्ता यामुळे पर्यटन व्यवसाय धोक्यात येऊ लागला आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर अलिबाग मध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx