अलिबाग : अलिबाग येथील समुद्रात बुडून दोन पर्यटक तरुण बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली आहे. तरुण समुद्रात बुडाल्याची माहिती मिळताच पोलीस व जीवरक्षक यांनी तातडीने शोध व बचावकार्य सुरू केले. शनिवारी रात्री ड्रोन आणि बॅटरीच्या सहाय्याने बुडालेल्या तरुणच शोध घेण्यात आला. तर रविवारी बोटींच्या सहाय्याने शोधकार्य राबविण्यात आले. मात्र रविवारी दुपारपर्यंत तरुणांचा शोध लागला नाही. शशांक सिंग (१९) व पलाश पखर (१९) अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत.
उरण नवी मुंबई परिसरातील चार मित्र अलिबागला फिरायला आले होते. संध्याकाळच्या सुमारास यातील एकजण पोहायला उतरला. तो बुडू लागल्याने दुसरा त्याला वाचवायला गेला. मात्र दोघेही बुडून बेपत्ता झाल्याची माहिती अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ जीवरक्षकांना पाचारण करण्यात आले. शनिवारी रात्रीच्या अंधारात ड्रोन आणि बॅटरीच्या मदतीने शोध घेण्यात आला. तर रविवारी बोटींच्या सहाय्याने शोधकार्य राबविण्यात आले. रविवारी दुपारपर्यंत तरुणांचा शोध लागला नाही. पोलीस निरीक्षक किशोर साळे आणि तहसीलदार विक्रम पाटील बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx