Saturday, December 27, 2025
आमदार, खासदारांचा मान राखण्याचा सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना
आमदार, खासदारांचा मान राखण्याचा सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना...

मुंबई : आमदार किंवा खासदार जर सरकारी कार्यालयाला भेट देण्यासाठी जर आले तर अधिकाऱ्यांनी जागेवर उठून उभे राहावे. त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकावे. फोनवर नेत्यांशी संवाद साधताना नम्र भाषेचा वापर करावा अशा मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र सरकारने गुरुवारी जारी केल्या. या सूचना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास, कारवाईचा इशाराही शासन निर्णयातून देण्यात आला आहे. राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी हा नवीन शासन निर्णय गुरुवारी जारी केला. 

लोकप्रतिनिधींना योग्य सन्मान देणे हा प्रशासनाविषयीची विश्वासर्हता आणि जबाबदारीची जाणीव होण्यासाठी महत्त्वाचा भाग असल्याचे म्हटले आहे. सर्वसामान्यांना चांगली वागणूक देण्याची अपेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते. पण प्रत्यक्षात काय स्थिती आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही पण पुढाऱ्यांची बेआदबी होणार नाही याची काळजी सरकार पुरेपूर घेत असल्याचे या नवीन निर्णयातून दिसून येत आहे.

तर लोकप्रतिनिधींशी संबंधित पत्रव्यवहारासाठी विभागांनी स्वतंत्र नोंदवही ठेवावी. दोन महिन्यात या पत्रातील तक्रारी, विचारणा, सूचना, हरकतींना उत्तर द्यावे, अशी सूचना ही या शासन निर्णयात देण्याती आली आहे. जर या वेळेत ती माहिती देणे शक्य नसेल तर तसे संबंधित अधिकाऱ्याने लोकप्रतिनिधीला कळवावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx