अलिबाग : एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त कैलास पगारे व विजय क्षीरसागर यांनी रायगड जिल्ह्यातील पेण, सुधागड व खालापूर तालुक्यातील प्रधानमंत्री जनजाती अभियान अंतर्गत अंगणवाडी केंद्राना भेट देत अंगणवाडी कामकाज बाबत माहिती घेतली. तसेच आदिवासी विकास विभागाच्या बहुउद्देशीय केंद्राची पाहणी करून आदिवासी वाडीवरील ग्रामस्थांसोबत संवाद साधला.
पेण तालुक्यातील मालवाडी या आदिवासी वाडीवरील अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन कैलास पगारे यांच्या हस्ते करण्यात आले. एकात्मिक बाल विकास प्रकल्प मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लेक लाडकी योजना पात्र लाभार्थींना धनादेश वाटप, मातृ वंदना योजना पात्र लाभार्थी ना पहिला हप्ता वितरण प्रमाणपत्र वाटप, बेबी केअर किट वाटप, अंगणवाडीतील बालकांना विद्यारंभ प्रमाणपत्र वाटप, गरोदर माता ओटीभरण, ६ महिने पूर्ण बालकाला अन्नप्राशन कार्यक्रम, नवचेतना मेळावा, आधार कॅम्प आयोजन तसेच पोषण माह २०२५ मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांचा सत्कार करण्यात आला. अंगणवाडी बालकांच्या नावाने विविध फळझाडे लाऊन वुक्षारोपण करण्यात आले.
खालापूर तालुक्यातील सक्षम किट प्राप्त अंगणवाडी केंद्राला भेट देऊन सक्षम किट मधील साहित्य व इन्स्टॉलेशनची माहिती घेतली. सुधागड बालविकास कार्यालय मार्फत vocal for local या संकल्पनेवर आधारीत सेविकांमार्फत तयार केलेल्या पाककृती पुस्तिकेचे
कैलास पगारे यांनी कौतुक केले. यावेळी १००० दिवस बाळाचे या पुस्तकाचे वितरण गरोदर माता, सरपंच यांना करण्यात येऊन बाळाच्या योग्य पालन पोषणासाठी पहिल्या १००० दिवसांचे महत्त्व समजाऊन सांगत अंगणवाडी सेविकांनी याबाबत जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करणेबाबत आवाहन केले.
सदर भेटीदरम्यान रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी निर्मला कुचिक, आदिवासी प्रकल्प अधिकारी, पेण, तेजस्विनी गलांडे, प्रकल्प अधिकारी प्रविण पाटील, तेजस्विता करंगुटकर, विशाल कोटागडे उपस्थित होते.
रायगड जिल्ह्याचे पोषण अभियान व इतर सर्व योजनांमध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे काम नेहमीच उल्लेखनीय राहिले आहे. बालकांच्या योग्य पालनपोषणासाठी १००० दिवस बाळाचे याबाबत सर्व अंगणवाडी सेविकांनी जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करावी.
: कैलास पगारे,
आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx