अलिबाग : अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील ॐ कार क्रीडा मंडळाची कबड्डीपटू पूर्वा राजेंद्र भगत (वय-२२) हिचे अल्पशा आजाराने निधन झाले.
पूर्वी भगत ही मुळची आठवणग तालुक्यातील नवखार येथील आहे. मागील ९ वर्षापासून ती ॐ कार क्रीडा मंडळाच्या संघातून कबड्डी खेळत होती. उत्तम कोपरारक्षक असलेल्या पूर्वाने आपल्या पकडीच्या जोरावर ॐ कार क्रीडा मंडळाला अनेक विजय मिळवून दिले. राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत रायगड जिल्हा जुनियर मुलींच्या संघात पूर्वांची निवड झाली होती. ती एक गुणी खेळाडू होती. तीच्या निधनामुळे ॐकार क्रीडा मंडळाच्या संघात पोकळी निर्माण झाली आहे.