Saturday, December 27, 2025
काशिद ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व एक सदस्य अपात्र
काशिद ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व एक सदस्य अपात्र ...

मुरुड : शासकीय जागेत अतिक्रमण करून बांधकाम केल्याचा ठपका ठेवत काशीदमधी सरपंच, उपसरपंच व सदस्य असे तिघांचे पदे रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. अलिबागमधील त्यांच्या दालनात झालेल्या अंतिम सुनावणीत हा निर्णय घेण्यात आला. अर्जदार रोहन खोपकर यांच्या वतीने ॲड. परेश देशमुख यांनी काम पाहिले होते.

ॲड. परेश देशमुख यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, काशिद ग्रामपंचायतीचे संतोष जयराम राणे हे सरपंच आहेत.तसेच  सुमित रमेश कासार हे उपसरपंच असून दिपेश दत्तात्रेय काते हे सदस्य आहेत. काशिद येथील  सर्व्हे नंबर २८/२ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या नावे ८४ गुंठे जागा आहे. सरपंच राणे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून या शासनाच्या जागेत अतिक्रमण करून दगड, विटा, मातीचे बांधकाम केले. शासनाची जागा असल्याचे माहित असतानादेखील जून २०२० मध्ये ही मालमत्ता स्वतःच्या नावे करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. ही बाब काशिदमधील रोहन रमण खोपकर यांच्या लक्षात आली. त्यांनी याप्रकरणी ॲड. परेश देशमुख यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात अपिल दाखल केले. ॲड. परेश देशमुख यांनी खोपकर यांच्या बाजूने केलेला युक्तीवाद व पुरावे ग्राह्य धरून जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी यांनी संतोष राणे यांना दोषी मानत त्यांचे सरपंच पद रद्द करण्याचे आदेश दिले.तसेच उपसरपंच सुमित कासार व सदस्य दिपेस काते यांचेदेखील पद रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. अतिक्रमण व बांधकाम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी यांच्या या निर्णयाने काशिदच्या सरपंचासह उपसरपंच व सदस्याला दणका मिळाला आहे. या निर्णयाकडे काशिदमधील नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते.या निकालाबाबत  ॲड. परेश देशमुख व रोहन खोपकर यांचे शेकाप प्रवक्त्य चित्रलेखा पाटील यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx