अलिबाग : दत्त जयंती चे औचित्य साधून जयेंद्र भगत पुरस्कृत, ग्रामस्थ मंडळ वडगाव यांच्या वतीने आयोजित स्व. काशिनाथ भगत व स्व. बाळू थळे स्मृती चषक कबड्डी स्पर्धा श्री स्वामी दत्तनाथ चैतन्यधाम ट्रस्ट रसाणी टेकडी येथे संपन्न झाली. या कबड्डी स्पर्धेत शिवाई बांधण संघाने जय भवानी वाशी संघवार मात करून प्रथम क्रमांक पटकवला, जय भवानी वाशी ला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. नूतन हनुमान ढवर संघ तृतीय तर जय हनुमान वायशेत संघाला चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले. एकूण 16 निमंत्रित संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत वायशेत संघाचा विनीत म्हात्रे याला उत्कृष्ठ चढाई , उत्कृष्ठ पकडीसाठी वाशी संघाच्या कौस्तुभ पाटील, पब्लिक हिरो ढवर संघाच्या सिद्धेश पाटील, तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून शिवाई बांधण संघाच्या राज जंगम यांना घोषित करण्यात आले.
विजेत्या संघाना वडगाव चे माजी सरपंच जयेंद्र भगत, जिल्हा सरकारी वकील ऍड. प्रसाद पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले .
सदर स्पर्धेचे उद्घाटन आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते झाले . यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आस्वाद पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील, वडगाव सरपंच सारिका पवार, सदस्य सरिता भगत, रुपाली पाटील, नीलम थळे, शुभांगी भगत, सजना नाईक, संतोष बोलें, प्रसाद पाटील, नरेश थळे, चंद्रकांत ठाकूर, महेश थळे, प्रफुल पाटील, मिलिंद भगत, किशोर भगत, संतोष सुतार, प्रमोद पाटील, नितेश थळे, अजय भगत, नथुराम कावजी, सीताराम भगत आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे निरीक्षक म्हणून जनार्दन पाटील यांनी केले. तर समालोचन सुनील थळे, नरेश कडू आणि प्रवीण भगत यांनी केले. यावेळी मंडळाचे सदस्य ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx