Saturday, December 27, 2025
ताम्हिणी घाटात दगड कारवर पडून महिलेचा मृत्यू
ताम्हिणी घाटात दगड कारवर पडून महिलेचा मृत्यू ...

माणगाव : ताम्हिणी घाट परिसरात डोंगरावरुन पडलेला‌ एक दगड कारचा सनरूफ तोडून आतमध्ये घुसला या दुर्घटनेत महिलेच्या डोक्याला मार लागून तिचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेचे नाव स्नेहल गुजराती असे आहे.

गुरुवारी सकाळी पुणे-रायगड जोडणाऱ्या ताम्हिणी घाटातून त्या प्रवास करत होत्या. घाटमार्गावर जोरदार पाऊस सुरू असताना अचानक डोंगरावरून छोटे मोठे दगड खाली पडत होते. काही दगड गुजराती यांच्या कारच्या टपावर आदळले. यातील एक दगड कारच्या सनरुफची काच फोडून थेट आतमध्ये घुसला. दगड डोक्यात लागल्याने स्नेहल यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांचा मुलगा आणि पती किरकोळ जखमी झाले आहेत. स्नेहल यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले, परंतू त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. पावसामुळे या भागात भूस्खलनाच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांनी अतिमहत्त्वाचे काम असल्याशिवाय घाटातून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx