अलिबाग : अलिबाग नगरपरिषदासाठी २ डिसेंबर रोजी मतदानप्रक्रिया राबविण्यात येणार असून, शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातच मागील तीन दिवसांपासून शहरात नागा साधूंचा वावर दिसून येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागा साधू शहरात दिसत असून, या साधूंनी एका उमेदवाराची भेटही घेतल्याची चर्चा शहरात दबक्या आवाजात सुरू आहे. हे साधू उत्तरप्रदेश येथून अलिबागमध्ये आल्याची माहिती पुढे येत आहे.
अलिबाग नगरपरिषदेत थेट नगराध्यक्ष तसेच २० नगरसेवक जागेसाठी २ डिसेंबर रोजी मतदानप्रक्रिया तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. मतदानाला शेवटचे चार दिवस शिल्लक असल्याने सर्वच उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते प्रचारात मागं आहेत. रॅली तसेच घरोघरी जाऊन प्रचार सुरू आहे.
त्यातच मागील तीन दिवसांपासून अलिबाग शहरात दोन आलिशान गाड्यांमधून नागा साधू फिरत आहेत. ठिकठिकाणी हे साधू नागरिकांच्या दृष्टीस पडत आहेत. या साधूंनी एका उमेदवाराची भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे निवडणुकीत उमेदवारांनी जादू टोना आधार घेतला आहे का? असा प्रश्नही चर्चिला जात आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx