अलिबाग : रायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण १४० जणांनी नगरसेवक पदासाठी तर १३ जणांनी नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. दरम्यान सोमवार (दि.१७) उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
जिल्ह्यातील एकूण १० नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्ष पदासह २१७ नगरसेवक पदांसाठी निवडणुका होत आहेत. १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसात १२ नोव्हेंबररपर्यंत जिल्ह्यात एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नव्हते. मात्र १३ नोव्हेंबरपासून उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात केली. आत्तापर्यंत १४० जणांनी नगरसेवक पदासाठी तर १३ जणांनी नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.
जिल्ह्यातील राजकीय हालचालींना यामुळे वेग आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सर्वच प्रमुख उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला आहे. उमेदवार प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यासोबत, मतदारांच्या घरोघरी जाऊन संपर्क साधत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नगरपरिषद : नगराध्यक्ष पदासाठी दाखल अर्ज: नगरसेवक पदासाठी दाखल अर्ज
खोपोली : ३ : १६
अलिबाग : १ : २१
श्रीवर्धन : ० : १
मुरुड : १ : २७
रोहा : ० : ०
महाड : १ : १
पेण : ० : २१
उरण : ७ : ५०
कर्जत : ० : ३
माथेरान : ० : ०
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx