Saturday, December 27, 2025
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले...

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा करत बिगुल वाजवला आहे. यासाठी २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे.  राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणुकांची माहिती दिली.

निवडणुकीस पात्र असलेल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणार आहे. एकूण ६८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्ष निवड होणार आहे. २४६ नगरपरिषदांमध्ये १० नवनिर्मित नगरपरिषदांचा समावेश आहे. आणि २३६ नगरपरिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे.

राज्यात एकूण १४७ नगरपंचायती आहेत. त्यापैकी ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये १५ नवनिर्मित नगरपंचायती आहेत. आणि २७ नगरपंचायतींची मुदत यापूर्वी संपलेली आहे. उर्वरित १०५ नगरपंचायतींची मुदत समाप्त झालेली नाही.


असा असेल निवडणूक कार्यक्रम

१० नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करता येईल

१७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येईल

अर्ज माघारीसाठी २१ नोव्हेंबरची मुदत असेल

२ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx