देश महाराष्ट्र
ठाणे : ठाण्यातील गांधीनगर परिसरात एका परप्रांतीय रिक्षाचालकाने एका किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून श हे गांधीनगर आहे, इथे फक्त भैय्या लोकांचेच राज्य चालेल अशा आशयाची वक्तव्ये केली. तसेच, मराठी माणसाला आव्हान देत “कोणी बोललं तर हम वस्तरा मार देंगे” असे वादग्रस्त वक्तव्य केले. तसेच त्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याची घटना समोर आली आहे. शैलेंद्र यादव असे या रिक्षाचालकाचे नाव असून, तो दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मनसेने तीव्र भूमिका घेतली. पोलिसांनी शैलेंद्र यादवला अटक केली. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात त्याला चोप दिला. मारहाणीनंतर शैलेंद्र यादवने आपली चूक मान्य करत दारूच्या नशेत बोलून गेलो, असे सांगत हात जोडून माफी मागितली. या प्रकारामुळे महाराष्ट्रातील परप्रांतीय आणि स्थानिक वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx