Saturday, December 27, 2025
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना फाशीची शिक्षा
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना फाशीची शिक्षा...

ऑनलाईन डेस्क : २०२४ मध्ये बांगलादेशात उफाळलेल्या हिंसाचारात शेकडो बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बांगलादेशी नागरिकांनी शेख हसिना यांचे सरकार उलथवून लावले होते. याच प्रकरणात बांग्लादेशच्या इंटरनॅशनल कोर्टाने शेख हसिना यांना मानवतेविरोधातील गुन्ह्यांत दोषी ठरविले आहे. 

शेख हसिना बांगलादेशच्या पंतप्रधानपदी असताना जुलै- ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशी मोठा हिंसाचार झाला होता. विद्यार्थ्यांनी समोर येत तेथे मोठे आंदोलन उभे केले होते. आंदोलकांनी बांगलादेशची संसद, पंतप्रधानांच्या निवासस्थानावर हल्ला केला होता. आंदोलकांना पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन सामानाची तोडफोड केली होती. हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी शेख हसिना यांनी लष्कर, पोलिसांना कारवाईचा आदेश दिला होता. त्यानंतर आंदोलन जास्तच भडकल्याने यूएनच्या रिपोर्टनुसार सुमारे १ हजार ४०० लोकांचा मृत्यू झाला होता. हे आंदोलन नंतर एवढे पेटले होते की बांगलादेशमधील शेख हसिना यांचे सरकारच उलथवून लावण्यात आले. हसिना यांना जीव वाचवण्यासाठी देश सोडून जावा लागला होता. सध्या शेख हसिना बांगलादेशमध्ये नाहीत. आता याच प्रकरणात बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्यूनलने शेख हसिना यांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx