अलिबाग : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) येत्या रविवारी (दि.२३) होणार आयोजित करण्यात आली असून, परीक्षेतील गैरप्रकारांना पूर्णविराम देण्यासाठी शिक्षण विभागाने अधिक काटेकोर उपाययोजना राबवल्या आहेत. बायोमेट्रिक हजेरी, परीक्षार्थीच्या चेहऱ्याची ओळख करण्यासाठी फेस स्कॅनिंग, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित \'लाइव्ह सीसीटीव्ही\' यांसह यंदा प्रथमच \'फोटो व्ह्यू\' आणि \'कनेक्ट व्ह्यू\' या दोन प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने डमी उमेदवारांचे चेहरे तत्काळ उघड होतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे नोंदणीवेळी अपलोड केलेल्या फोटोतील व्यक्तीच परीक्षेला बसतेय की अन्य कुणी? याची लागलीच पडताळणी होणार आहे. सदर परीक्षा पनवेलमधील सहा परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार असून, रायगड जिल्हयातुन पेपर क्रमांक एकसाठी २ हजार ५१५ तर पेपर दोन साठी ३ हजार ४५९ उमेदवार परिक्षा देणार आहेत.
महाटीईटी परिक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी व परिक्षेतील गैरप्रकारांना पुर्णविराम देण्यासाठी शिक्षण विभागाने यंदा अधिक काटेकोर उपाययोजना राबविल्या आहेत. प्रत्येक केंद्रावर २४ तास रेकॉर्डिंग १ करणारी एआय आधारित सीसीटीव्ही यंत्रणा, चेहरा व ध्वनीतील विचलन टिपणार आहेत. तसेच मोबाइल, गॅजेटस, संशयास्पद हालचाली स्वयंचलितपणे ओळखण्याची क्षमता असून परीक्षेदरम्यान मुख्य नियंत्रण कक्षातून थेट नजर राहील.
तसेच बायोमेट्रिक, फेस स्कॅनिंग मध्ये विद्यार्थ्यांच्या बोंटांचे छाप व चेहरा स्कॅन केला जाणार आहे. परिक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करणेत आली आहे. सदर परीक्षा दोन सत्रांत पार पडणार आहे. सकाळी १०.३० ते दुपारी १ दरम्यान पाहिले सत्र तर दुपारी २.३० ते ५ फर्मान दुसरे सत्र पार पडणार आहे. परीक्षे दरम्यान जिल्हाधिकारी किशन जावळे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले या परीक्षा केंद्रांना अचानक भेट देऊन परीक्षा केंद्रांची पाहणी करतील.
महाटीईटी परीक्षेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. \'फोटो व्ह्यू\' आणि \'कनेक्ट व्ह्यू\' या नव्या प्रणालीमुळे डमी उमेदवारांना थारा मिळणार नाही. सर्व केंद्रांवर दक्षता, देखरेख आणि नियंत्रण यंत्रणा अधिक मजबूत केली आहे. पनवेलमधील सहा परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार असून, सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
: ललिता दहितुले,
शिक्षणाधिकारी, प्राथमिक
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx