Saturday, December 27, 2025
मालवण नगरपरिषद निवडणूक भाजप पदाधिकाऱ्यावर मतदारांना पैसे वाटपाचा आरोप?
मालवण नगरपरिषद निवडणूक भाजप पदाधिकाऱ्यावर मतदारांना पैसे वाटपाचा आरोप?...

देश महाराष्ट्र 

सिंधुदुर्ग : मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शिवसेना आमदार नीलेश राणे यांनी भाजपचे जिल्हा चिटणीस विजय केनवडेकर यांच्या घरी जाऊन मतदारांना पैसे वाटपाचा आरोप करीत स्टिंग ऑपरेशन केले. पैसे सापडल्याचा प्रकार नीलेश राणे यांनी पोलिसांसह निवडणूक अधिकाऱ्यांना दाखवला आणि त्याचा लाईव्ह व्हिडिओही तयार केला. दरम्यान, केनवडेकर यांनी निलेश राणे यांचे आरोप फेटाळून लावीत ही रक्कम पूर्णपणे वैध असून माझ्या व्यवसायाशी संबंधित आहे, असे स्पष्ट केले आहे.

नीलेश राणे यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसह आणि पोलिसांना सोबत घेऊन अचानक केनवडेकर यांच्या घरी धाड टाकली. घरात मोठी रक्कम ठेवल्याचा आरोप करत त्यांनी केनवडेकर यांच्याशी थेट सवाल केला. त्यांनी तातडीने निवडणूक विभागाच्या पथकाला बोलवले आणि त्यांच्याकडून कायदेशीर कारवाई सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

राणे यांच्या सर्व आरोपांवर केनवडेकर यांनी तीव्र आक्षेप घेतला. \"ही रक्कम पूर्णपणे वैध असून माझ्या व्यवसायाशी संबंधित आहे. मी बांधकाम व्यावसायिक आहे आणि घरात कोणतीही अनधिकृत रक्कम नाही. विरोधी आमदारांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत,\" असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx