मुंबई : शिक्षण क्षेत्रातील त्रिभाषा सूत्रासंदर्भात दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे वरळीमध्ये आयोजित विजयी मेळाव्यात प्रथमच एकत्र आले. यांनतर सातत्याने दोनही बंधूंच्या भेटीगाठी वाढत आहेत. त्यातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि मनसेत जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीमध्ये मनसेला ७० ते ८० च्या आसपास जागा देण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटाकडून दर्शवण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. तर मनसेने १२५ जागा लढण्याची तयारी केली आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत आणखी काही फेऱ्या होऊन जागा वाटप निश्चित करण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे. एकीकडे मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. काँग्रेसने मनसेसोबत जाण्यास नकार दिला आहे, या सर्व पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx