Saturday, December 27, 2025
मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या याचा पोलीस गोळीबारात मृत्यू
मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या याचा पोलीस गोळीबारात मृत्यू...

मुंबई : मुंबईच्या पवईमधील आर ए स्टूडिओमध्ये रोहित आर्या याने काही मुलांना डांबून ठेवलं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या स्टूडिओला घेराव घातला, त्यानंतर पोलिसांनी आरोपी रोहित आर्या याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फोल ठरला. दरम्यान मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रोहित आर्या याचा मृत्यू झाला आहे. या स्टूडिओमधून १७ मुलं आणि एका नागरिकाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एका वेबसिरीजच्या चित्रिकरणासाठी या स्टूडिओमध्ये ऑडिशन सुरू होतं. गुरुवारी (दि.३०) सकाळी १०० पेक्षा जास्त मुलं या ऑडिशनसाठी दाखल झाले होते. त्यानंतर रोहित आर्या याने यातील काही मुलांना घरी परत पाठवले, तर १७ मुलांसह एका नागरिकाला त्याने स्टूडिओमध्ये डांबून ठेवलं होतं, या घटनेनं मोठी खळबळ उडाली होती. मुलांची सुटका करण्याच्या प्रयत्नामध्ये झालेल्या गोळीबारात रोहित आर्या जखमी झाला होता. रुग्णालयात त्याला दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx