Saturday, December 27, 2025
शिवसेना कोणाची? सुनावणी २१ जानेवारीला
शिवसेना कोणाची? सुनावणी २१ जानेवारीला...

मुंबई : शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचं? या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (दि.१२) सुनावणी पार पडणार होती. मात्र, आता पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, पुढील सुनावणी २१ जानेवारी रोजी पार पडणार आहे.

राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. या निवडणुकांपूर्वी या प्रकरणावर निर्णय यावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रयत्न सुरू होते. पण आता या प्रकरणावर सुनावणी ही २१ जानेवारी रोजी होणार आहे. 

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे नाव, चिन्ह तसेच पक्षासंदर्भात निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय (शिवसेना एकनाथ शिंदेंना तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना) या विरोधात सर्वोत्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. यावर बुधवारी सुनावणी होती. या सुनावणीत सर्व पक्षांचे वकील उपस्थित होते. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं, ही सर्व प्रकरण ओव्हरलॅपिंग आहेत त्यामुळे यावर एकत्रितपणे सुनावणी घेता येईल. दोन्ही पक्षांना युक्तिवादासाठी प्रत्येकी २ तास दिले जाणार आहेत.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx