Saturday, December 27, 2025
शेकाप काँग्रेस आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी अक्षया नाईक यांची उमेदवारी जाहीर
शेकाप काँग्रेस आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी अक्षया नाईक यांची उमेदवारी जाहीर...

अलिबाग : अलिबाग नगरपरिषदेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येत असून, शेकाप, काँग्रेस आघाडीने थेट नगराध्यक्ष पदासाठी शेकापच्या अक्षया नाईक यांची तर वॉर्ड क्रमांक पाचमध्ये नगरसेवकपदासाठी काँग्रेसचे समीर ठाकूर, वॉर्ड क्रमांक सातमध्ये नगरसेवकपदासाठी अभय म्हामूणकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी उमेदवारांची नावे जाहीर केली.

शेकाप भवनमध्ये शेकाप व काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप राज्य कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक, काँग्रेसचे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष राजा ठाकूर, माजी तालुकाध्यक्ष योगेश मगर, प्रभाकर राणे, ॲड. उमेश ठाकूर, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, जगदीश कवळे, विजय भगत, पांडुरंग भगत, सुकुमार भगत, ॲड. सचिन जोशी, संजना कीर, अश्विनी पाटील, महेश शिंदे, राकेश चौलकर आदी उपस्थित होते.

या बैठकीत अक्षया नाईक यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. अक्षया नाईक या अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कन्या आहेत. त्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच अलिबाग नगरपरिषदेत २० जागांसाठी निवडणूक होणार आहे. वॉर्ड क्रमांक पाचमधील नगरसेवकपदाच्या उमेदवारीसाठी काँग्रेसचे समीर ठाकूर, वॉर्ड क्रमांक सातमधील नगरसेवकपदाच्या उमेदवारीसाठी अभय म्हामुणकर यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx