Saturday, December 27, 2025
सहावी लाठी जिल्हास्तरीय अजिंक्य स्पर्धा संपन्न
सहावी लाठी जिल्हास्तरीय अजिंक्य स्पर्धा संपन्न...

अलिबाग: जिल्हा क्रीडा संकुल नेहूली अलिबाग येथे शनिवारी (दि.२२) सहावी लाठी जिल्हास्तरीय अजिंक्य स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत जिल्हाभरातून शंभरहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अलिबाग मार्शल आर्ट्स अकॅडमी अलिबाग संघाने सर्वात जास्त पदके पटकावून पहिल्या नंबरचे चषक पटकावले तसेच दुसऱ्या नंबरचे चषक न्यू विद्यामंदिर नागाव स्कूल न पटकावले व तिसऱ्या क्रमांकाचे चषक आर्य एज्युकेशन गरुडपाडा स्कूलने पटकावले.


 या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केलेल्या खेळाडूंची सोलापूर येथे होणाऱ्या सहाव्या लाठी राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा २०२५ साठी निवड झाली आहे. या स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून अलिबाग क्रीडा अधिकारी अंकिता पिळणकर उपस्थित होत्या. सदर स्पर्धा लाठी रायगड असोसिएशन अध्यक्ष प्रमोद मसाळ, सचिव प्रियांका गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शुभम नखाते, संदेश सुर्वे, वेदांत सुर्वे, रुपेश शेळके व पंच  सिद्धार्थ पाटील, रुद्राक्ष खारकर, नम्रता चव्हाण, वरद वर्तक, अनिकेत पाटील यांचे सहकार्य लाभले.


Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx